योगेश खरे, नाशिक : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. याबाबत आता शासनाने देखील गंभीर चिंता व्यक्त केली असून राज्यात कडक निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यात देखील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर देवस्थानाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे आठवडाभरासाठी बंद राहणार आहे.


त्र्यंबकेश्वर मंदिर हे 29 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे. कोरोणाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने त्र्यंबकेश्वर नगरीत भीतीचे वातावरण आहे. देशातील वेगवेगळ्या भागातून भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भाविकांनी त्र्यंबकेश्वरात न येण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे.


कालच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजभळ यांनी देखील नाशिककरांना इशारा दिला होता. नियम पाळले गेले नाहीत तर जिल्ह्यात जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.