रायगड : थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन पर्यटकांचे हाल होतात. मागील अनुभव लक्षात घेता येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. 


यावेळेत वाहतूक बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड जिल्ह्यातून जाणा-या मुंबई-गोवा व मुंबई-पुणे महामार्गासह प्रमुख रस्त्यावरील अवजड वाहतूक ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. ३० डिसेंबरला सकाळी सात वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद असेल. 


या ठिकाणी वाहने उभी करणार


३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला देखील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून रस्त्यावरील अवजड वाहनं पेट्रोल पंप येथे उभी ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेय. 


समुद्र किनारी सुरक्षा


तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्र किनारी सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत जीवरक्षक तैनात ठेवण्याच्या सूचना नगरपालिका तसच मेरीटाईम बोर्डाला देण्यात आल्यात. पर्यटकांनी भान राखून आनंद लुटावा, असं आवाहनही रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.