Gateway Of India To JNPA : गेटवे ऑफ इंडिया ते JNPT प्रवास फक्त 25 मिनिटांत होणार आहे. मुंबईच्या समुद्रात ई-स्पीड बोट धावणार आहेत. फेब्रुवारी 2025 पासून अत्याधुनिक बोट धावणार आहेत. जुन्या बोटीने याच प्रवासासाठी एक तासांचा वेळ लागत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या (जेएनपीए) संचालक मंडळाने नवीन वर्षात जुन्या लाकडी प्रवासी बोटी टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2025 पासून प्रवाशांना गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए पोर्ट मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीने प्रवास करता येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी या मार्गावर इलेक्ट्रिक स्पीड बोट सुरु केल्या जाणार आहेत. या बोटींनी   गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी प्रवास 25 मिनिटांत पूर्ण करता येतो. जुन्या बोटीने या प्रवासासाठी एक तसांचा कालावधी लागतो. 


प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच जलद प्रवासासाठी, JNPA ने इलेक्ट्रिक स्पीड बोट म्हणजेच ई-वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जेएनपीएने माझगाव डॉकला दोन इलेक्ट्रिक स्पीड बोट बनवण्याचे कंत्राट दिले आहे. फेब्रुवारीपर्यंत स्पीड बोट प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.


इलेक्ट्रिक स्पीड बोट या जेएनपीएतर्फे चालवल्या जाणार नसून अन्य कोणत्या तरी संस्थेला या बोटी चालवण्याचे कंत्राट दिले जाणार आहे. जेएनपीएमध्ये इलेक्ट्रिक स्पीड बोटची सुविधा आहे. आता सर्वसामान्य प्रवाशांनाही स्पीड बोटने प्रवास करता येणार आहे.


इलेक्ट्रिक स्पीड बोटमध्ये एकाचवेळी 20 ते 25 प्रवासी प्रवास करू शकतात. वॉटर टॅक्सीची बॅटरी अवघ्या 30 मिनिटांत चार्ज होते. अंदाजे 64 KWH क्षमतेची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर समुद्रात 2 ते 4 तास चालू शकते. सध्या गेटवे ऑफ इंडिया येथून जेएनपीए, एलिफंटा, अलिबाग आणि इतर मार्गांवर जलवाहतूक सुरु आहे.