भंडारा : Bhandara Tigers : जिल्ह्याच्या पवनी उमरेड करांडला अभयारण्यात पर्यटकांना शाडो वाघिणचा ताफा पाहायला मिळाला. 1 शाडो वाघिण, तिचे 3 बछडे आणि दोन वाघ असा हा ताफा होता. एका पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात ही दृश्य चित्रित केली आहेत. वाघिणीचं अख्ख कुटुंब ऐटीत फिरताना दिसल्यानं पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भंडारा जिल्ह्याच्या पवनी उमरेड करांडला अभयारण्यात पर्यटकाना शाडो वाघिनचा ताफ़ा पहायला मिळाला असून एखादया व्हीआयपी व्यक्तीच्या सुरक्षितेसाठी जसा गाड्यांच्या ताफा दिमतीला असतो तसाच वाघाचा ताफा यावेळी पर्यटकाला दिसला आहे. यात शाडो वाघिण व तिच्या 3 पिल्लाच्या संरक्षणासाठी दोन मोठे वाघ नियुक्तिला असल्याचे समोर आले.


शाडो नामक मादा वाघिणे आणि तिच्या 3 बछड्यांची सुरक्षा हे दोन मोठे वाघ करतांना दिसले. एकदम कडक सुरक्षेच्या घेऱ्यात हे शाडो फॅमिली जाताना दिसली आहे. दरम्यान पर्यटकाला 6 वाघाचे दर्शन घडले असून भोला सचदेव या पर्यटकांने आपल्या कैमेरात ही सगळी दृश्य चित्रित केली आहे.