Trending Video :  बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांच्या मदतीला धावून आला. त्याचा कार्यामुळे त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सर्वसामान्यांसोबत त्याचा संवाद पाहून त्याचा चाहत्यावर्ग वाढतं आहे. सोनू सोशल मीडियावरही खूप सक्रीय असतो. त्याचा नुकताच एका व्हिडीओने (Sonu Sood Video) नेटकऱ्यांची झोप उडवली होती. ज्यात तो तुफान धावत असलेल्या ट्रेनच्या दरवाज्यावर बसला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्या तो खूप संतापलेला दिसतं आहे. 


काय घडलं नेमकं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनू सूद जेव्हा नागपूर (nagpur news) ते चंद्रपूर (chandrapur news) दरम्यान प्रवास केला त्यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नागपूर ते चंद्रपूर असा प्रवास सोनूने कारने केला. त्यावेळी रात्रीच्या वेळी प्रवासाचा थकवा घालण्यासाठी तो एका चहाच्या टपरीवर थांबा. सोनूची एक खासियत आहे तो कायम सर्वसामान्यांशी संवाद साधत असतो. 



मग चहावाल्याशी त्याने गप्पा मारायला सुरुवात केली. 'सकाळपासून किती कप चहा विकला गेला असा प्रश्न तो विचारतो. त्यावर चहावाल्या म्हणाला 200 ते 300 कप चहा विकला.' हे ऐकून सोनू अवाक् झाला आणि त्याने चहावाल्याला आपल्याला पार्टनर बनवशील का अशी ऑफर दिली. 


सोनू संतापला


पुढे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्या चहाच्या टपरीवर (tea stall ) दोन व्यक्ती चहा पिण्यासाठी आले होते. सोनूने त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली, तोच सोनू संतापला...कारण या दोघांपैकी एका व्यक्तीने तोंडात गुटखा (tobacco) धरला होता. सोनू त्या व्यक्तीवर वैतागला आणि म्हणाला की, तू गुटखा खातो का, ते चांगल नाही, जा थुंकून ये. आता कधीच गुटखा खाऊ नकोस असाही सल्ला दिला.  त्या व्यक्तीनेही लगेचच जाऊन रस्त्याच्या कडेला गुटखा थुंकला. (trending video Sonu Sood tea stall for chewing Gutkha or tobacco nagpur chandrapur Car travel viral on social media)  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)


सोनूचं असे दिलखुलास गप्पा पाहून आणि त्याची ही शैली पाहून नेटकरी फिदा झाले आहे. हा व्हिडीओ सोनूने त्याचा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. दरम्यान विदर्भात मोठ्या प्रमाणात लोक गुटख्याचे सेवन करतात. काही दिवसांपूर्वी विमानात गुटखा थुंकायचा आहे विमानाची खिडकी उघडा, असं एका तरुणाने म्हटलं आणि विमानात एकच हास्य फुललं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.