Viral news of snake :बरेच  व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. सापाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पहिले जातात पसंत केले जातात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खूप लोकांकडून व्हिडीओ पहिला जात आहे आणि खूप शेअर केला जात आहे अमरावती जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर शिंगे असलेल्या सापाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.


सोबत शिंग असलेला सापचा उल्लेख धर्म ग्रंथात आढळतो असेही मेसेज व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये कपाशीच्या शेतात एक साप जाताना दिसतो आणि त्याला शिंग असल्याचं सांगितलं जातय.


आणखी वाचा:Shocking news Sushant Singh Rajput चा मर्डरच? या व्यक्तीचा खळबळजनक खुलासा


सोशल मीडियात सध्या अनेक तर्कवितर्क या सापाबाबत लावले जात आहेत. मात्र झी २४ तासने याबाबत सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सापाला शिंग असल्याच्या चर्चेत तथ्य आढळलं नाही. सापाने बेडकाची शिकार केली आहे,


त्या बेडकाला तोंडाच्या बाजूने सापाने कंबरेपर्यंत गिळलंय. मात्र या बेडकाचे पाय सापाच्या तोंडाबाहेर असतानाच सापाने तिथून पळ काढला. त्यामुळे व्हिडिओत सापाला शिंग आल्याचं दिसत आहे हे सत्य उघड झालंय.


असे बरेच व्हिडीओ कुठलीही सत्यता न तपासता व्हायरल केले जातात मात्र अशा व्हिडिओमागची सत्यता तपासूनच ते शेअर कारण गरजेचं आहे.