Trending viral : शुभमंगल सावधानsss नाहीतर...,भटजीबुवांच्या इंग्रजीमधील मंगलाष्टाका झाल्या Viral
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून खूप लोक तो पाहत आहेत.
Viral trending: लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याच्या शपथा घेतात. सध्या सगळीकडे लग्नसराईसुद्धा सुरु आहे. हिंदू लग्नपद्धतींमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे लग्न केलं जात . महाराष्ट्रात विशेषतः एक वेगळी पद्धत आहे लग्न लागताना गुरुजी बुवा मंगलाष्टका म्हणतात आणि शुभ मंगल सावधान म्हणतच लग्न लावलं जात.आता या मंगलाष्टकांमध्ये सुद्धा वेगवेगळेपण असत जस जशी गाव बदलतात तश्या पद्धती बदलतात असं म्हटलं जात, मंगलाष्टकांच्या मध्ये अनेक भावनिक उपदेशात्मक गाणी देखील गायली जातात.
व्हायरल होतोय व्हिडीओ
सोशल मीडियावर अनेक व्हडिओ व्हायरल होत असतात, बरेचसे लोकांना आवडले कि ते मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात, आणि असे शेअर केलेलं व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात . असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या इंटरनेटवर पसरतोय आणि लोक हा व्हिडीओ खूप पाहत आहे आणि शेअरसुद्धा करत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि लाईकसुद्धा केलाय.
आणखी वाचा: बुरी नजर वाले तेरा मुह काला! दारावर लिंबू मिरची का बांधतात? खरं कारण ऐकून व्हाल हैराण
नेमकं काय होतंय व्हायरल
तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, एक लग्न लागताना दिसतंय यात गुरुजी लग्नासाठी मंगलाष्टके म्हणत आहेत आणि नेमकं तेव्हाच आजूबाजूचे हसताना दिसत आहेत पण
आता तुम्ही म्हणाल यात हसण्यासारखं काय आहे तर हे हसण चेष्ठा उडवण्यासाठी नसून जे बोलत आहेत त्यासाठी आहे. महाराष्ट्रीयन लग्नात मराठीमध्ये नाही तर चक्क इंग्रजीमध्ये मंगलाष्टके म्हणत आहेत.
आजूबाजूच्या महिला हे मंगलाष्टके सुरू असताना हसताना आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून खूप लोक तो पाहत आहेत.
तर या हटके इंग्लिश मंगलाष्टकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर 1 लाख 40 हजारांच्याही वर लोकांनी लाईक केला आहे. चांगलाच व्हायरल होत आहे.