Nashik Trimbakeshwar Mandir :  त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथांच्या मंदिरातील दानपेटीतल्या उत्पन्नाच्या वाटपावरून पुजारी आणि वारक-यांमध्ये वाद निर्माण झालाय. या देणगीतला 60 टक्के वाटा मंदिर व्यवस्थापनावर खर्च केला जातो. तर 40 टक्के भाग हा पूजा-यांना दिला जातो. यावर आक्षेप घेत वाकर-यांनी थेट धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे. 


देणगीच्या वाटपावरून संघर्ष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुजा-यांना उत्पन्नातला वाटा न देता नोकरी म्हणून पगार द्यावा अशी मागणी वारक-यांनी केली आहे. तर, शिवाजी महाराजांच्या काळापासून उत्पन्नातला वाटा देण्याची प्रथा असल्याचा दावा पुजा-यांनी केलाय. तसंच 2015 मध्ये धर्मदायुक्तांनी दिलेल्या निकालानुसार हे वाटप सुरू असल्याचा दावाही पुजा-यांनी केलाय. त्यामुळे आता या देणगीच्या वाटपावरून संघर्ष सुरू झालाय. 


वारकरी पुजाऱ्यांवर आक्रमक


ब्रह्मगिरी च्या पायथ्याशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी स्थळ आहे. दरवर्षी आषाढी वारीचे प्रयाण सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर मधून या समाधीस्थळापासून केले जाते. या मंदिराच्या उत्पन्नामध्ये दानपेटीत मिळणारी देणगी मध्ये 60% मंदिरा व्यवस्थापन खर्च आणि पुजाऱ्यांना 40% उत्पन्नाचा भाग दिला जातो. त्यावर वारकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, या दिंडीचा उत्पन्न आणि खर्च ताळमेळ बसत नाही. दिंडी तीस ते चाळीस किलोमीटर आड मार्गाला जाते आणि निधी तूटवडा होत असल्याने वारकरी आता आक्रमक झाले आहेत. साठ टक्के व्यवस्थापन खर्चात वर्षभर संस्थांचे पगार कर्मचाऱ्यांचे पगार इतर खर्च निघत नाहीत परिणामी वारकऱ्यांनी थेट पुजाऱ्यांना लक्ष केले आहे. 


अर्थ कारणासाठी वारकरी आणि पुजाऱ्यांमध्ये वाद


मात्र,  पुजाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळापासून देशातील उत्पन्न देण्याची प्रथा असल्याचा सांगितला आहे. इतकच नाही तर नुकतच 2015 मध्ये धर्मदायुक्तांनी दिलेल्या निकालानुसार गोसावी कुटुंबातील तीन कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर सुरू असल्याचा दावा केला हे वाटप कायदेशीर पद्धतीनेच होत असल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं आहे. जिल्ह्यातील सर्व वारकरी प्रतिनिधींनी मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडे आणि धर्मदाय आयुक्तांकडे उत्पन्नातील हिस्सा ऐवजी पगार देण्याबाबत मागणी केली आहे. ऐहिक सुखापासून दूर करणाऱ्या या संप्रदायाच्या मार्गावर वारकरी आणि पुजारी यांचा मोलाचा वाटा असतो मात्र हे दोघेच अर्थ कारणासाठी भांडू लागल्याने सेवेचा मोल मात्र वादात सापडल आहे.