कल्याण नगर महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहनांची एकमेकांना धडक, 8 ठार
Accident News In Marathi: कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला असून यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Accident News In Marathi: कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. अपघातात तब्बल ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर येते. ट्रक पिकअप आणि रिक्षा यांच्या धडकेत हा विचित्र अपघात झाला आहे
ट्रक पिकअप आणि रिक्षा यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिकअप नगरकडून कल्याणच्या दिशेने जात होती तर रिक्षा कल्याणकडून नगरच्या दिशेने जात होती तर ट्रकदेखील कल्याणकडून नगरच्या दिशेने जात असताना या तिनही वाहनांची समोरा समोर जोरदार धडक झाल्याने झाली. ही धडक इतकी भीषण होती की सर्व वाहनांचा चक्काचुर झाला आहे.
भीषण अपघातात गणेश मस्करे, कोमल मस्करे, हर्षद मस्करे, काव्या मस्करे, नरेश दिवटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू. अपघातात पिकअप मधील एकाच कुटूंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये ४ वर्षाच्या मुलाचा आणि ६ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. रिक्षामधील चार प्रवाशांचा ही जागीच मृत्यू. रिक्षा चालक नरेश दिवटेची ओळख पटली असून रिक्षातील इतर तीन प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम ओतूर पोलिसांकडून सुरू आहे. पिकअपमधील चारही मृत्य हे जुन्नर तालुक्यातील मढ पारगाव चे रहिवाशी आहेत.
रविवारी सासवड चिव्हेवाडी घाटात अपघात
रविवारी पुण्यातील सासवड चिव्हेवाडी घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला होता. धान्य घेऊन जात असलेला ट्रक घाटात पलटी झाल्याने कारमधील दोघांचा चेंगरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. व्हॅगनार मधील गणेश लेकावळे आणि तृप्ती जगताप यांचा जागीच मृत्यू झालाय तर मागे बसलेल्या ज्येष्ठ महिला आणि लहान मुलगी थोड्या वाचली आहे. अपघात एवढा भीषण होता की धान्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याने व्हॅगनार कारचा चुराच झालाय. चिव्हेवाडी घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला आहे. त्यामुळे सासवड-भोर हा मार्गावर वाहतूक कोंडी ही झाली.