Pune Accident News: पुण्यातील सासवड चिव्हेवाडी घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सासवड-भोर मार्गावरील चिव्हेवाडी घाटातच हा अपघात घडला आहे. व्हॅगनर कार व धान्याने भरलेला ट्रक यांच्यात अपघात झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटातून धान्य घेऊन जात असताना ट्रक अचानक कारवरती पलटी झाला. त्यामुळं कारमध्ये बसलेल्या दोघांजणांचा मृत्यू झाला आहे. व्हॅगनार मधील गणेश लेकावळे आणि तृप्ती जगताप यांचा जागीच मृत्यू झालाय तर मागे बसलेल्या ज्येष्ठ महिला आणि लहान मुलगी या थोडक्यात बचावल्या आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.


अपघात इतका भीषण होता की धान्याने भरलेला ट्रक पलटी झाल्यानंतर व्हॅगनार कारचा चक्काचुर झाला आहे. चिव्हेवाडी घाटातील वळणाचा अंदाज चालकाला न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळं हा अपघात झाला आहे. या अपघातानंतरसासवड-भोर हा मार्गावर वाहतूक कोंडी देखील झाली होती. 


नागपूरात भीषण अपघात


नागपूर जिल्ह्यातील काटोल मध्ये क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  काल मध्यरात्रीनंतर काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली. क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली आणि त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात होते. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.


तिसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळून कामगार ठार


सांगलीच्या मिरजेत लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यु झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कुणाल चव्हाण,असे मृत व्यक्तीचे  तर योगेश भंडारे,असे जखमी कामगाराचे नाव आहे.