प्रशांत परदेशी, झी 24 तास, धुळे : काळा आणि वेळ एकत्र आले आणि घात झाला. तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील सोनगीर-दोंडाईचा रस्त्यादरम्यान मेथी गावाजवळ ट्रक, ट्रॅक्टर आणि दुचाकी चा विचित्र अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनगीर कडून दोंडाईचाकडे जात असलेल्या ट्रकने सुरुवातीला दुचाकीला धडक दिली. ही दुचाकी समोर चालणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. यात मोटरसायकलचा अक्षरशः चक्का चुरडा झाला. 


या अपघातात धुळ्यातील हर्षल ठाकूर तसेच मेथी गावातील रहिवासी आनंद सिंग गिरासे आणि सुखराम भील या तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


इको कारला फॉर्च्युनर कारने धडक दिल्याने 13 जण जखमी झाले आहेत. यामधे इको मधील 1 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. 


काही जखमींना तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वर तलासरी येथील अच्छाड येथे भीषण अपघात झाला आहे.