प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने महागड्या ट्रकची विक्री करणाऱ्या टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या टोळीने धक्कादायक खुलासे केले असून संपूर्ण महाराष्ट्रात हादरून सोडणारा हा ट्रक घोटाळा पोलिसांनी उघड केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या साह्याने विकले जाणारे 12 ट्रक आतापर्यंत जप्त केली असून आणखी 27 ट्रकचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी साजिद शेख आणि आर टी ओ एजंट इफ्तेकार अहमद उर्फ पापा एजंट या दोघांना ताब्यात घेतलं आहे.  


जप्त ट्रक या चोरीच्या आहेत कि कर्ज काढून घेतलेले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.  या कारवाईत पोलिसांनी एक कोटी 44 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि टोळी संपूर्ण देशात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे कारण वेगवेगळ्या राज्यात या ट्रकची नोंदणी करण्यात आली आहे. 


आर टी ओ विभागात नोंदणी केली जात असताना या कागदपत्रांची पड्ताळणी करण्यात आली नाही का ? असा प्रश्नही समोर आला असून. आर टी ओ विभागातील कोणी अधिकारी अथवा कर्मचारी या टोळीचा सदस्य आहे का याचा शोध घेणे महत्वाचे होणार आहे. 


अशी होती मोडस ऑपरेंडी
बनावट कागदपत्रांच्या आधारे ही टोळी महागड्या ट्रकची खरेदी करत होती. गुजरात आणि महाराष्ट्रात या ट्रकाची पासिंग केली जात होती. त्यानंतर या ट्रकची विक्री केली जात होती. यात आरटीओ विभागातील काही कर्मचाऱ्यांची मिलीभगत होती का याचा शोध आता पोलीस घेत आहेत.