तुकाराम मुंढे यांनी नाशिकचे अंदाजपत्रक केले सादर
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर आज अंदाजपत्रक सादर केलंय. 2018 ते 2019 साठी आयुक्तांनी 1785.15 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर केलंय.
नाशिक : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर आज अंदाजपत्रक सादर केलंय. 2018 ते 2019 साठी आयुक्तांनी 1785.15 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर केलंय.
अंदाजपत्रक स्थायी समितीत सादर
शहराला नवी दिशा देणारं आणि योग्य अंदाजपत्रक असल्याचं सांगत त्यांनी संपूर्ण अंदाजपत्रक स्थायी समितीच्या बैठकीत सादर केलं. विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून रखडलेला बससेवेचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. याशिवाय सायकल ट्रॅक आणि गोदाघाट या प्रमुख विषयांचाही समावेश यांत करण्यात आला आहे.
आयुक्तांवर स्तुतीसुमने
आयुक्तांनी तीन आठवड्यामध्येच हे अंदाजपत्रक तयार केल्यानं अनेक सदस्यांना याबाबत प्रश्न निर्माण होते मात्र अंदाजपत्रक सादर झाल्यानं सर्वच सदस्यांनी आयुक्तांवर स्तुतीसुमने उधळत स्वागत केलंय. लवकरच यावर सदस्यांच्या सूचनांचा विचार करून महासभेत अंदाजपत्रक ठेवण्यात येणार असल्याचं सभापतीं आडके यांनी सांगितलंय.