COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे हाय कोर्टात हजार न राहिल्याने कोर्टाने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करावा का ? असा सवाल न्यायालयाने केला आहे. लॉन्समालकांवर कारवाई केल्यानंतर लॉन्मालकांनी घेतली हायकोर्टात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर कोर्टाने हा सवाल केलाय. दोन दिवसांची स्थगिती दिली असतांनाही लॉनसवर कारवाई करण्यात आली होती. या सुनावणी दरम्यान इतर अधिकारी उपस्थित होते पण आयुक्त मुंढे उपस्थित नसल्याने कोर्टाने खडेबोल सुनावले आहे.आज तीन वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.


अभियंत्यांच्या बदल्या 


 नाशिक महापालिकेत सध्या बदल्यांचा धडका सुरू आहे. धडकेबाज आयुक्त तुकाराम मुंढेंनी आज मनपाला २२ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या केल्यात. याशिवाय वैद्यकीय विभागातील ८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहे. प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलाय. याशिवाय  राजकीय दबाव सहन केला जाणार नाही, असंही मुंढेंनी स्पष्ट केलंय..