नागपूर : तुकाराम मुंढे यांनी आज नागपूर महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे हे आज नागपूर महापालिका कार्यालयात दाखल झाले. पदभार स्वीकारल्यानंतर मुंढेंनी नागपूर महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची सुमारे ५० मिनिटं मीटिंग घेतली. त्यानंतर मेट्रोच्या कार्यक्रमाला तुकाराम मुंढे रवाना झाले. पहिल्याच मीटिंगमध्ये तुकाराम मुंढे यांनी उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुनावले. मीटिंगमध्ये उशिरा आलेले चालणार नाही, असे स्पष्ट बजावले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुकाराम मुंढे कडक शिस्तीचे आहेत. त्यांची नवी मुबंई, नाशिक महापालिकेत शिस्त दिसून आले. उशिरा येणारे आणि काम चुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच काहींना घरचा रस्ता दाखवला आहे. आज पहिल्याच दिवशी नागपूर पालिकेत मिटिंगसाठी उशिरा आलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आणि  मोबाईल वाजायला नको, अशी तंबी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली. तुकाराम मुंढे आज महापालिकेत रुजू झाले त्याच दिवशी मुख्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती दर्शवणारी पंचिंग मशीनच खराब झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ  उडाली होती.


दरम्यान, नागपूर महापालिकेत तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आल्याचे वृत्त समजताच पालिकेत कर्मचारी धास्तावला होता. मुंढे येणार असल्याची बातमी समजतात संपूर्ण महापालिका स्वच्छ करण्यात आली. महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ होताना पाहायला मिळाली. राज्यभरात तुकाराम मुंढे यांची कडक शिस्तीचे आणि सचोटीने नियम पाळणारा अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यामुळे मुंढे यांच्या हाताखालील अधिकारी वर्ग नेहमीच सतर्क असतो. नागपूर महापालिकेतही गुरुवारी त्याचे प्रत्यंतर आले.


तसेच कर्मचारी कधी नव्हे तर वेळेवर येण्यासाठी धावपळ करताना दिसले. तर काहींनी पंचिंग मशिनसाठी रांग लावल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वी दिसून आले होते. आज अनेक कर्मचारी अधिकारी वेळेवर हजर झाले होते. मात्र, मिटिंगला उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना खडेबोड ऐकावे लागले. त्यांना चांगलेच मुंडे यांनी खडसावले.