आता, नाशिकमध्येही उभा राहणार नागरिक विरुद्ध तुकाराम मुंढे वाद?
मनपाकडे सुरुवातीस प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार अनधिकृत बांधकामांचे मार्किंग करण्यात येतंय.
किरण ताजने, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरातील अनधिकृत लॉन मालकांवर कारवाईला सुरुवात केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा सिडकोमधील अनधिकृत बांधकामाकडे वळविलाय. सिडकोमधील असलेले अनधिकृत बांधकांवर लाल रंगाने रेखांकन केले जात आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता घरांवर रेखांकन केले जात असल्याने नागरिक चांगलेच धास्तवलेत. नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्विकारल्यापासून शहरातील अनाधिकृत बांधकावर लक्ष केन्द्रित केलेय. बिल्डरांना एसीत घाम फोडल्यानंतर आता मुंढे यांनी सिडकोत पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाइनवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचा निर्णय घेतलाय.
मनपाकडे सुरुवातीस प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार अनधिकृत बांधकामांचे मार्किंग करण्यात येतंय. सिडको व परीसरातील सर्वच ठिकाणांच्या गटारीवरील बांधकामे तसेच रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. महापालिकेकडून या रेखांकनाला जागोजागी नागरिकांकडून विरोध होऊ लागलाय. कुठलीही सूचना नदेता रेखाकण केले जात असल्याने नागरिक चांगलेच धास्तवलेय.
दरम्यान मुंढे यांच्या या भूमिकेमुळे नागरिक आणि मुंढे असा वाद उफळण्याची चिन्हे आहेत.. नाशिकमध्ये आयुक्त मुंढे आले होते तेव्हा नाशिककर त्यांचे स्वागत करीत होते मात्र आता या कारवाईमुळे रोष व्यक्त केला जातोय.