तुकाराम मुंढेंचा नगरसेवकांना जोरदार दणका
आयुक्त तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत नाशिक मनपाच्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांची नांगी टाकल्याचे दिसून आले. 35 पैकी 25 प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवलेय.
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत नाशिक मनपाच्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांची नांगी टाकल्याचे दिसून आले. 35 पैकी 25 प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवलेय.
पंचवीस प्रस्ताव मागे
नाशिक महापालिकेच्या पहिल्या महासभेत पस्तीस पैकी पंचवीस प्रस्ताव मागे घेण्यात आलेत. तुकाराम मुंढे यांनी हा जोरदार दणका दिलाय. सर्व प्रस्तावांची योग्यता तपासूनच मांडणार, असं आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केलंय.
विरोधकांकडून जोरदार स्वागत
त्यांच्या या निर्णयाचं विरोधकांनी जोरदार स्वागत केलं आहे. एकंदरीत तुकाराम मुंढे यांनी आपल्या धडाकेबाज कामाला नाशिक महापालिकेतही दणक्यात सुरुवात केली आहे.
महापालिकेत गोंधळ
नाशिक महापालिकेत अभूतपूर्व गोँधळ बघयाला मिळाला. जुना विकास आराखडा रद्द करून नवीन आराखडा तयार करण्यासंदर्भात महापौरांनी आयुक्तांना आदेश दिले. यावेळी विरोधकांनी गोंधळ केला. महापौरांच्या जवळ जाऊन विरोधकांनी जाब विचारला. आज आयुक्त तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत प्रथमच पालिकेची महासभा झाली. त्यात सुरुवातीलाच ३५ पैंकी २५ प्रस्ताव मागे घेण्यात आले.