गोंदिया : गोंदिया शहराच्या अनेक भागात सामुहिक तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी कार्तिक एकादशी पासून या तुऴशी विवाहांना सुरुवात होते. ग्रामीण भागात या तुळशी विवाहाला विशेष महत्त्व असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक महिन्यात तुळशी विवाहानंतरच गावोगावच्या विवाह समारंभाना सुरुवात होते. भारतीय संस्कृती तसेच सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन भागात मागील १० वर्षा पासून सामूहिक तुळशी विवाहाची ही परंपरा सातत्याने सुरु आहे.


कोणताही जाती धर्म ,पंथ न मानता हिंदू , मुस्लिम ,शीख, बांधव एकत्र येत वर पक्षाकडून पारंपरिक पद्धतीने ढोल ताश्याच्या गजरात वरात काढून नाचत, गाजत  वधू पक्षाच्या घरी पोहचतात. त्या नतर पूजेला सुरवात करून नतर तुळशी समोर अंतरपाट पकडतात मंगलाष्टकांना सुरवात होते. मंगलाष्टकं पूर्ण होताच आरती करून हे विवाह समारंभ पार पडले अशी घोषणा पंडितांकडून केली जाते. विशेष बाब म्हणजे वधु पक्षा कडून लग्नाच्या आयोजनाची तसेच जेवणाची तयारी केली जाते.