उस्मानाबाद : तुळजापूरातील तुळजाभवानी मंदिरात आजपासून पेड दर्शनाची सुविधा उपलब्ध  झाली आहे. दररोज १२ ते ५ वेळेत भक्तांना सशुल्क दर्शन घेता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रति व्यक्ती १०० रुपये घेण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय. पेड दर्शनासाठी अभिषेक पूजेच्या मार्गाचा वापर करून भक्तांना अभिषेक हॉल मधून दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.  तुळजा भवानी मंदिरातच्या इतिहासात पहिल्यांदाच असा पेड दर्शनाचा निर्णय झाला आहे.


 दररोज पाच तास पेड दर्शनाची सोय भक्तांना मिळणारय. या पेड दर्शनाच्या सुविधेसाठी दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालणाऱ्या अभिषेक पूजा सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे आता पेड दर्शनाच्या सुविधेमुळे मंदिराचं दररोज ५० हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.