तुळजाभवानी मंदिरात वार्तांकन करायला पत्रकारांना बंदी
उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिरात वार्तांकन करण्यापासून पत्रकारांना रोखण्यात आलाय.
उस्मानाबाद : उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिरात वार्तांकन करण्यापासून पत्रकारांना रोखण्यात आलाय. उस्मानाबादचे अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा तुघलकी कारभार बघायला मिळाला. त्यांनी दमदाटी करून चित्रिकरण करणाऱ्या पत्रकारचा कॅमेरा बंद केला.
तीन प्रकारचे प्रवेश पास काढूनही पत्रकारांना प्रवेश देण्याबाबत मंदिर संस्थानाची टाळाटाळ सुरु आहे. मंदिराची गैरसोय आणि भाविकांचा त्रास माध्यमांतून जनतेसमोर येऊन नये म्हणून प्रसारमाध्यमांची ही मुस्कटदाबी केली जात आहे. यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.