तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ
तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला असून मातेची निद्रा ही 21 सप्टेंबरला होणाऱ्या घटस्थापनेपर्यंत पर्यंत सुरू राहणार आहे.
उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला असून मातेची निद्रा ही 21 सप्टेंबरला होणाऱ्या घटस्थापनेपर्यंत पर्यंत सुरू राहणार आहे.
नवरात्रोत्सवापूर्वी भाद्रपद वद्य अष्टमी ते अश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा ही मंदिरातील शेज घरात सुरू असते. देवीची मूर्ती विधिवत पूजा करून शेज घरातील चांदीच्या पलंगावर निद्रिस्त केली जाते. साडेतीन शक्तीपीठांपैकी ही एकमेव चलमूर्ती आहे.
वर्षातून तीन वेळा मूळ मूर्ती सिंहासनावरुन हलवली जाते. या निद्रा काळात दर्शनासाठी खूप कमी भाविक येतात. तुळजापूर शहरात नवरोत्सवाची पूर्वतयारी मंदिर प्रशासनाकडून सुरु आहे. नवरात्रौत्सवासाठी मंदिर परिसरातील दुकानंही सज्ज होतायत.