Tungabhadra Dam Brench: कर्नाटकातील प्रमुख जलाशयांपैकी एक असलेल्या तुंगभद्रा धरणाच्या येथे मोठी दुर्घटना घडली आहे. तुंगभद्रा धरणाच्या गेटची साखळी तुटल्यामुळं 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 70 वर्षांनंतरची ही पहिलीच मोठी घटना आहे. सध्या धरणातून 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुंगभद्रा धरणाच्या 19व्या गेटवरील साखळी शनिवारी मध्यरात्री तुटल्याने नदीत अचानक 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणातून सुमारे ६० टीएमसी फूट पाणी सोडल्यानंतरच जीर्णोद्धाराचे काम हाती घेता येईल, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. 


कर्नाटक जिल्ह्यातील कोप्पल जिल्ह्याचे प्रभारी मंत्री शिवराज तंगडगी यांनी रविवारी पहाटे धरणाला भेट दिली. शनिवारी रात्रीच्या घटनेनंतर रविवारी सकाळपासून तुंगभद्रा धरणाच्या सर्व ३३ दरवाजांमधून पाणी सोडण्यात येत आहे. तुंगभद्रा धरणाच्या सर्व 33 दरवाजातून पाणी सोडले जात असल्यामुळं सध्या धरणातून सुमारे एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  



तुंगभद्रा हे कर्नाटकातील सर्वात मोठे धरण आहे. सध्या धरणाच्या पाणी पातळी घट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मध्यरात्री ही घटना घडल्यामुळं अधिकाऱ्यांचेही धाबे दणादणाले होते. सध्या युद्धपातळीवर धरणाचे पाणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अन्यथा या मुळं धरणाला धोका पोहोचू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. धरणाचे पाणी नदीत सोडण्यात आल्याने लोकांच्या घरात पाणी शिरू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या तरी प्रशासन थोड्या थोड्या वेळाने धरणातील पाणी पातळी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.