सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तूरडाळीच्या दरात वाढ; पाहा नवीन दर
अवकाळी पाऊसामुळे तूर डाळीच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून तूरडाळ गायब होण्याचे संकेत पाहायला मिळत आहे.
Tur Dal Prices Increase : गेल्या काही महिन्यांपासून महागाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता सर्वसामान्यांना आणखी एक झटका लागणार आहे. अवकाळी पाऊसामुळे तूर डाळीच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून तूरडाळ गायब होण्याचे संकेत पाहायला मिळत आहे.
तूरडाळीचे दर 180 ते 200 रुपयांवर
तूरडाळीच्या दरात गेल्या आठवडाभरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर 180 ते 200 रुपयांवर गेले आहेत. अपुरा पाऊस, काढणीला झालेला अवकाळी पावसामुळे तूरडाळीचे उत्पादन घटले आहे. त्यातच अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या वर्षभरात तूरडाळीचे दर चढेच आहेत.
गृहिणींचे बजेट कोलमडणार
गेल्या आठवडाभरात तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो सरासरी 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे तूरडाळ ही 180 ते 200 रुपये प्रतिकिलोवर गेली आहे. त्यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
सध्या बाजर समितीमध्ये तुरीचे दर बारा हजार रुपये प्रतिक्विंटलवर इतके झाले आहेत. फेब्रुवारी – मार्च महिन्यात 10 हजार रुपयांवर असलेल्या तुरीच्या दरात एप्रिलमध्ये दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. कृषी पणन मंडळाच्या माहितीनुसार, शनिवारी अमरावती बाजार समितीत लाल तुरीला सरासरी 11, 800 जालना (पांढरी) 11,376 अकोला 12,075 नागपूर 11,842, छ. संभाजीनगर 10,800 आणि परतूरमध्ये 11,100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
पाऊस कमी झाल्यामुळे तूरडाळीचे उत्पन्न
दरम्यान अपुरा पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे तूरडाळीच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच तुरीचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच तुरीचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सात हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असतानाही तुरीची खरेदी सरासरी 9 ते 10 हजार रुपयांनी सुरू आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे तूरडाळीचे उत्पन्न घटल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे घरखर्चाचे बजेट पुन्हा एकदा कोलमडणार आहे.