Twin Towers to Chandani Chowk : उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) इथं अनधिकृतपणे उभे राहिलेले  ट्वीन्स टॉवर (Supertech Twin Towers) अखेर पाडण्यात आले. अवघ्या 9 सेकंदात देशातील सर्वात उंच उमारत जमीनदोस्त झाली. ही इमारत पाडण्यासाठी 3 हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता असाच कंट्रोल ब्लास्टिंगचा (control blasting) अनुभव पुणेकरांना येणार आहे. वाहतूक कोंडीला कारण ठरलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल दहा सेकंदात पाडला जाणार आहे. नोएडातील ट्विन टॉवर पाडलेली संस्था ( (Edifice Engineering) चांदणी चौकातील पूल पाडणार आहे...यासाठी पूल आणि परिसराची माहिती घेण्यासाठी नोएडाहून (Noida) एक पथक पुण्यात दाखल होणार आहे.


पूल पाडण्यासाठी कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीचा वापर होणार आहे. बारा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान हा पुल पाडला जाईल अशी माहिती आहे .वाहतूक कोंडी होत असल्याने हा पूल पाडून दुसरा पूल बांधला जाणार आहे. त्यासाठी हा पूल पाडून लवकर कामाला सुरूवात होणार आहे.


चांदणी चौकातला हा पूल 30 मीटर लांबीचा आहे. पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर्सप्रमाणेच स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. पूल पाडण्यापूर्वी वाहतूकीचं नियोजन करण्यात येईल. दोन ते तीन तासांसाठी पुलाखालचा रस्ता वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.