संजय पवार, झी मीडिया, सोलापूर : ट्विटर, फेसबुक आणि गुगल या सोशल मीडियाने केवळ व्यक्तींच्या मनात घर केले नाही तर आता थेट या सोशल मीडियाने घरातील स्वयंपाक घरात प्रवेश केला आहे. ट्विटर फेसबुक आणि गुगल या सोशल नेटवर्किंग च्या नावाने गहू चा ब्रँड बाजारात आलाय , याला ग्राहकांची पसंती मोठ्या प्रमाणात असल्याने सोलापूरच्या मार्केट यार्डात या ब्रँडने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोलापूरच्या मार्केत यार्डात असेच बोल ऐकू येऊ लागले आहेत. आजवर आपण विविध ब्रँडच्या गहू, तांदूळाची नावं आपण ऐकली आहेत. कधी कधी तर देवी देवता आणि मुला-मुलींची नावंही दिल्याचं पाहायला मिळतं. मात्र या पारंपरिक नावांऐवजी आता सोलापुरात गुगल, फेसबुक, व्हॉट्सट्अॅप आणि ट्विटर अशा विविध नावांच्या पोत्यांमधून गव्हाची विक्री केली जाते आहे.


हा गहू मध्य प्रदेशातील रत्लाम या भागातून येतो आहे. या गव्हाला सोलापुरात नाही तर कर्नाटकातही चांगली मागणी आहे.


समाज माध्यमांची भुरळ प्रत्येकावरच पाहायला मिळते. आता ग्राहकांना आकर्षित करण्याची ही अनोखी पद्धत सध्या सोलापुरात चर्चेचा विषय ठरली आहे.