बॅंक ऑफ बडोदा दरोडा किती कोटींचा पाहा
जुईनगर रेल्वे स्टेशन नजीकच्या बॅंक ऑफ बडोदा शाखेवर ७० फुटावरील एका दुकानातून भुयार खोदून दरोडा टाकला होता. मात्र, या दरोड्यात किती रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला, याची माहिती आता पुढे आलेय.
नवी मुंबई : गजबजलेल्या ठिकाणी आणि जुईनगर रेल्वे स्टेशन नजीकच्या बॅंक ऑफ बडोदा शाखेवर ७० फुटावरील एका दुकानातून भुयार खोदून दरोडा टाकला होता. मात्र, या दरोड्यात किती रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला, याची माहिती आता पुढे आलेय.
दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, जुईनगर येथील बँक ऑफ बरोडा दरोडा प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. बँकेच्या बाजूच्या बालाजी स्टोअर्स दुकानातून भुयार खोदून चोरट्यांनी बँक लॉकर फोडले होते.
दोन गाड्या जप्त
दरोडेखोरांनी जवळपास ३० हून अधिक लॉकर फोडून सुमारे २ कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी लुटल्याने एकच खळबळ उडालीय. याप्रकरणी आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून, दोन गाड्या जप्त करण्यात आल्यात. आणखी तिघा आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेच हाती
दरम्यान, या दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन जण नायलॉन गोणीतून काहीतरी वस्तू नेत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघा संशयतांना ताब्यात घेतले.