Pune Crime News :  पुण्याच्या सासवड तहसीलदार कार्यालयातून ईएमव्ही मशीनची चोरी करणाऱ्या चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचा प्रकार घडलाय. यानंतर आज ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरीला गेलेली मशीन प्रशिक्षणासाठी असल्याचं पुरंदर तहसीलच्यावतीने सांगण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले होते.  येथे ठेवलेल्या 40 EVM मशिन्सपैकी एकच डेमो युनिट अज्ञात चोरट्यांनी चोरले आहे.   चोरीला गेलेली मशीन प्रशिक्षणासाठी असल्याचं पुरंदर तहसीलच्यावतीने सांगण्यात आले.अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तुटलेल्या स्थितीत आढळून आले.  सासवड तहसील कार्यालयाने ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे. 


अजिंक्य राजू साळुंखे आणि भैय्या बंडगर या दोन चोरट्यांना ईव्हीएम मशीनसह ताब्यात घेण्यात आले आहे तर हलकर्जीपणा केल्यामुळे प्रशासनातील मोठ्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत . या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली होती. घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देत पाहणी केली आहे. मात्र यात आता मोठी घडामोड समोर येत असून या चोरी प्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. यात पुरांदराचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांचे निलंबन करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल देखील मागवण्यात आला आहे तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, पोलिस अधिकारी तानाजी बेर्डे अशी निलंबन केलेल्यांची नावे आहेत


पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सोमवारी ईव्हीएम मशीन चोरीचा प्रकार समोर आला होता आणि यानंतर आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. या दोघांकडून मशीन पोलिसांनी हस्तगत केल्यास आणखी एक आरोपी पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. या गुन्ह्यामध्ये दिसणाऱ्या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहे का ? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून अद्याप याबाबतची माहिती दिली जात नाही. मात्र या संदर्भात सुरू असलेल्या कारवाईला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पुष्टी मिळते आहे.