Shocking News : अशी वेळ कोणत्याच आई-बापावर येवू नये; एकाच वेळी दोन्ही लेकरांचा जीव गेला
Shocking News : शाळेतून घरी जात असतानाच या दोघा भावांडान मृत्यूने गाठले. या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली : जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही. मृत्यू कोणाला कधी कुठे गाठेल याचा काही नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना सांगली (Sanagli) जिल्ह्यात घडली आहे. दोन लहान भावांचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या दोन लहान लेकरांचे मृतदेह पाहून आई-बापावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Shocking News).
सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. तलावामध्ये पडून दोघ्या सख्या चिमुरड्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अय्याज युनूस सनदी (वय 9) आणि अफान युनूस सनदी (वय 5) अशी मृत्यू झालेल्या दोघा भावंडांची नावे आहेत.
शाळा सुटल्यावर दोघेही घरी निघाले होते. गावातील नागरगोजे वस्तीवरील शासकीय तलावा शेजारून जाताना लहान भावाचा पाय घसरला आणि तो पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने पाण्यात उडी घेतली. लहान भावाने मोठ्या भावाला मिठी मारली आणि दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे सनदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेने मिरज तालुक्यात हळूहळू व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाले असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.
इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याणच्या कैलास नगर परिसरात घडली. रेहान शेख असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेहान हा कैलास नगर परिसरात राहतो. शाळेतून आल्यावर तो कैलास नगर परिसरातील मोकळ्या जागेवर खेळत होता. याच ठिकाणी एका बिल्डरने इमारतीसाठी खड्डा खोदून ठेवला होता, या खड्ड्यात पाणी साचलेले होते. रेहानचा बॉल या खड्ड्यात गेल्याने रेयान बॉल काढण्याचा प्रयत्न करत होता. याच वेळी त्याचा तोल गेला आणि रेहान खड्ड्यातील पाण्यात पडला. काही नागरिकांचा याकडे लक्ष गेलं त्यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली. याबाबत अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत रेहानला शोधण्याच कार्य सुरू केले. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर रेहानचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला. दरम्यान संबंधित बिल्डरने या ठिकाणी खड्डा खोदला मात्र सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना केली नाही त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.