ठाणे : former Shiv Sena corporators Rada : शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची भर रस्त्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाण्यातील वागळे परिसरात दोन माजी नगरसेवकांची शिव्यांची लाखोली. वाहली. या माजी सेना नगरसेवकांचा रस्त्यावरील राड्याने अनेकांचे मनोरंजन झाले. त्यांच्या अश्लिल भाषेत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल आहे. रस्त्यावरील या राड्यानंतर विकास रेपाळे आणि नम्रता फाटक यांच्यावर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातल्या वागळे परिसरात भर रस्त्यात दोन सेना माजी नगरसेवकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी एकमेकांना चपलेने मारहाण केली. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता फाटक यांच्यात वादावादी झाली. नेमका वाद कशामुळे झाला, याचं कारण अस्पष्ट आहे. मात्र सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. यावर आता पालकमंत्री एकनाथ शिंदे आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.