बोअरवेलमधून तब्बल दोनशे फुट उंच पाण्याचा कारंजा
लामकानी-रामी शिवारात पुन्हा बोअरवेलमधून तब्बल दोनशे फुट उंच पाण्याचा कारंजा उडाला. फोअरवेच्या आकाराची पाण्याची धार तब्बल दोनशे फुट उंच जात असल्याचं पाहून गावकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं.
धुळे : लामकानी-रामी शिवारात पुन्हा बोअरवेलमधून तब्बल दोनशे फुट उंच पाण्याचा कारंजा उडाला. फोअरवेच्या आकाराची पाण्याची धार तब्बल दोनशे फुट उंच जात असल्याचं पाहून गावकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं.
पाण्याचा हा कारंजा एका तासाहून अधिक काळ वर उडत होता. या पाण्याचा जोर इतका होता की तीनशे फुट खोल टाकलेली जलपरी मोटार या पाण्याच्या जोरामुळे बाहेर फेकली गेली. त्यामुळे हा कारंजा पाहताना प्रत्येक जण आवाक झाला होता.
फरीद बागवान यांच्या शेतात बोअरवेलमध्ये मोटार टाकण्याचं काम सुरू होतं. मोटर बोअरवेलमध्ये टाकल्यावर तिची चाचणी घेण्यासाठी तिला सुरू केल्याबरोबर जमिनीतून कारंजा बाहेर पडला. पंधरवड्यात अश्या पद्धतीने जमिनीतून वायुवेगाने पाणी बाहेर निघण्याची ही दुसरी वेळ असल्याने भूगर्भ तज्ज्ञांनी या भागात येऊन तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.