सांगली : सांगली, मिरजेतील दोन बेकायदा हॉस्पीटल सील करण्यात आलेत. महापालिकेचे कोणतेही परवाने नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने या हॉस्पिटलवर ही कारवाई केलीये. सांगलीतील मोहिते हॉस्पिटल आणि मिरजेतील अॅपल हॉस्पिटलवर ही कारवाई करण्यात आलीये.


आरोग्य विभागाची कारवाई 


 डॉ. चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात केंद्राचं प्रकरण उघडकीस आल्यानंत आरोग्य विभागानं महापालिका क्षेत्रातील सर्वच हॉस्पीटलची झाडाझडती सुरु केलीये. यात मोहिते हॉस्पिटलच्या चालक डॉ. सुनीता मोहिते या बीएएमएस पदवीधारक तर अ‍ॅपल हॉस्पिटलचे चालक इम्तियाज मुल्ला यांची बीएचएमएस पदवी असून ते प्रसूतीगृह चालवीत असल्याचे उघडकीस आलंय.