कर्जत येथील धबधब्यावर जाण्यास दोन महिन्यांची बंदी
कर्जत येथील धबधब्यावर फिरायला जाण्यास दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विकएंडला जाणाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेय.
मुंबई : कर्जत येथील धबधब्यावर फिरायला जाण्यास दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विकएंडला जाणाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेय.
मुंबई -पुणे या दोन शहराच्या मध्यभागी असलेल्या कर्जत तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे पावसाळ्यात हजारो पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधब्यावर फिरायला - मजा करायला जातात. पण मौज मजा करण्याच्या नादात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
काल शुक्रवारी कर्जत तालुक्यातील सोनलपाडा धरणात दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून कर्जत तालुक्यातील महत्वाच्या धबधब्यावर आणि धरणावर दोन महिन्याची बंदी घातली आहे. त्यामुळे दोन महिने पर्यटकांना या धबधब्यावर आणि धरणावर फिरण्याचा आनंद लुटता येणार नाही.