तुषार तपासे, सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीभोवतीचं अनधिकृत बांधकाम शिंदे-फडणवीस सरकारनं पाडलं. मोठ्या फौजफाट्यासह तब्बल 22 तास अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु होती. पण अतिक्रमण काढल्यानंतर अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबरीशेजारी आणखी दोन कबरी मिळाल्यात. यातली एक अफजल खानाच्या कबरीशेजारी आहे, जी सेवेकऱ्याची असल्याचं सांगितलं जातंय. तर ज्या जागेवर अतिक्रमण काढलं त्या खोलीत दुसरी कबर सापडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मात्र धक्कादायक म्हणजे या कबरी नेमक्या कुणाच्या आहेत याची कुणालाच माहिती नाहीत. हजरत महमंद अफजल खान मेमोरियल सोसायटी ट्रस्टलाही याबाबत माहिती नाही. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानं बांधण्यात आलेली अफजल खानाची कबर काही फूट होती पण वनविभाच्या एकरभर जागेवर अतिक्रम करण्यात आलं होतं. पण शिंदे-फडणवीस सरकारनं हे अतिक्रमण पाडलं. त्यात दोन नव्या कबरी सापडल्यानं नवं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.