नाशिक : शहरात आठवडाभरात बलात्काराची दुसरी घटना घडली आहे. शहरातील अंबड इथली घटना ताजी असतांना म्हसरूळ इथं अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. मैत्रिणीनं बोलाविल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बलात्कारप्रकरणी २७ वर्षीय नराधम बाजीराव सांगळेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आठवड्याभरातील दोन घटनांनी नाशिक शहरात खळबळ उडालीय.