माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दुसरा धक्का
माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिवसभरात दुसरा धक्का बसलाय. केसरकरांना मंत्रिपद मिळालेलं नाहीच.
सिंधूदुर्ग : माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिवसभरात दुसरा धक्का बसलाय. केसरकरांना मंत्रिपद मिळालेलं नाहीच. त्यात सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झालाय. सावंतवाडीत नगराध्यक्षपदी भाजपचे राणे समर्थक संजू परब यांचा विजय झालाय. त्यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा पराभव केला. ३०९ मतांनी बाबू कुडतरकर यांचा पराभव झाला.
तर दुसरीकडे रत्नागिरीत मात्र शिवसेनेचा विजय झाला. रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून प्रदीप उर्फ बंडया साळवी १०९२ मतांनी विजयी झाले. भाजपने रत्नागिरीत दीपक पटवर्धन यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर रत्नागिरीत तळ ठोकून होते. तरीही भाजपला मात देण्यात सेनेला यश आलं.