प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : चीनचं वुहान शहर हा सध्या भीतीचा विषय आहे. कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक जण वुहानमधून बाहेर पळायचा प्रयत्न करतोय. पण धुळ्याचे दोन जण वुहानमध्येच आहेत. तांत्रिक कारणामुळे त्यांना येता आलं नाही, मात्र आता त्यांनी पूर्ण खबरदारी घेऊन तिथेच राहायचा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळ्याचे राहणारे चंद्रदीप जाधव आणि गिरीश पाटील यांना बॅटरी'वर संशोधन करण्यासाठी त्यांनी चीन सरकारची फेलोशिप मिळाली, त्यामुळे २०१९पासून ते तिकडेच आहेत. या दोघांचं वास्तव्य वुहानमध्ये आहेत. कोरोना व्हायरसमुळे या शहराविषयी सगळ्या जगात धास्ती आहे. कोरोनाच्या भीतीनं अनेक जण वुहान सोडून पळत असले तरी चंद्रदीप आणि गिरीश मात्र परतलेले नाहीत. तांत्रिक अडचणींमुळे ते परतले नसले तरी वुहानमध्ये ते सुरक्षित आहेत.


आर्थिक अडचणींमुळे भारतात परतता आलं नसल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं दोघांचं म्हणणं आहे. भारत सरकार, चीन सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या सातत्यानं संपर्कात असल्याचं दोघांनी स्पष्ट केलंय.


भारतात परत आल्यावर काही दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागणार. त्यानंतर परत चीनमध्ये  उर्वरित शिक्षणासाठी परत जावे लागणार. यादरम्यान ज्या विद्यापीठात शिक्षण सुरू आहे, त्या विद्यापीठाची पूर्व परवानगी न घेता गेलो तर पुन्हा प्रवेश दिला जाणार की नाही ? शैक्षणिक नुकसान झाले तर ते भरून निघणार नाही. या भीतीपोटी हे तरुण भारतात आलेले नाहीत. 


चंद्रदीप आणि गिरीश हे हे सतत आपल्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. तीन सरकारकडून त्यांना अग्रिम फेलोशिपची रक्कम देण्यात आल्यामुळे त्यांच्याकडे पुरेशी रक्कमही आहे. महिन्याभराचा किराणा त्यांनी भरून ठेवला असल्यामुळे आणि चीन सरकारकडून त्यांना शेगडी आणि इतर उपकरणे दिली गेल्यामुळे, त्यांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी निघाला आहे. हे दोन्ही तरुण सुरक्षित ठिकाणी असल्यामुळे त्यांचे कुटुंबही निर्धास्त आहेत.


भारत सरकारकडून  जी परवानगी त्यांच्या विद्यापीठाकडून घेतली जायला पाहिजे होती, ती परवानगी घेतली न गेल्यामुळे या तरुणांना भारतात येता आलेला नाही.


आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली असती तर त्यांना भारतात येता आलंही असतं, मात्र याचं त्यांना दुःख नाही. थोडासाच अभ्यासक्रम शिल्लक असताना ते कोरोना व्हायरसचं एपिसेंटर असलेल्या वुहानमध्ये राहात आहेत. व्हायरसची लागण होऊ नये, म्हणून ते पुरेशी सतर्कता बाळगत आहेत. आपलं संशोधन पूर्ण करूनच परत येण्याचा निर्धार त्यांनी आता केलाय. संशोधन यशस्वी करून त्याचा आपल्या देशाला फायदा व्हावा, हा चंद्रदीप आणि गिरीश यांचा निर्धार कायम आहे.



दुपारच्या टॉप हेडलाईन्स


जाणून घ्या काय आहे तानाही कड्याचा इतिहास.....


शिक्षिकेला जाळणाऱ्या आरोपीला अटक, हिंगणघाट बंदची हाक


शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला


Defence Expo 2020 : गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर हायअलर्ट जारी


यवतमाळ निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी