कल्याण : गोव्यावरुन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेसच्या शौचालयातून दारुचा मोठा साठा जप्त केल्याची घटना समोर आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातला जाणाऱ्या कोचीवली-पोरबंदर एक्स्प्रेसच्या शौचालयातून व्होडकाच्या दोन हजार बाटल्या जप्त केल्यात. चोरीच्या मार्गाने ही दारु गुजरातमध्ये नेली जात होती. 


कल्याणच्या रेल्वे सुरक्षा बलानं ही कारवाई करताना दारुचा हा साठा जप्त केला. दरम्यान, मडगाव रेल्वे स्थानकावरच्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेतायत.