आरोग्य शिबीर आटोपून घरी निघाले; पण वाटेतच 2 डॉक्टरांवर काळाचा घाला, बीड हळहळले
Two Doctor Died In Accident: बीडमध्ये दोन तरुण डॉक्टरांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Two Doctor Died In Accident Beed: आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून अंबाजोगाईला येत असताना झालेल्या अपघातात जोन डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन डॉक्टरांवर काळाचा घाला
अंबाजोगाई - आडस येथील आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून दोन्ही डॉक्टर अंबाजोगाईला जात होते. त्याचवेळी चनईजवळ त्यांची कार झाडाला आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आहे. तर कारमधील काही काचा आत घुसल्या आहेत. अपघात इतका भीषण होता की दोन्ही डॉक्टरांचा यात मृत्यू झाला आहे.
कार झाडाला आदळली
डॉ. प्रमोद राजाभाऊ बुरांडे (वय ३९) आणि डॉ. रवी संतोष सातपुते (वय ३८) अंबाजोगाई असं मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते हे दोघेही निष्णात फिजिओथेरपिस्ट होते. आडस येथील आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. कार्यक्रम आटोपून ते अंबाजोगाईकडे निघाले होते. आडस ते चनई रोडवर असलेल्या उतारावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली आणि हा अपघात घडला आहे. दोन उमद्या डॉक्टरांच्या मृत्यूमुळे अंबाजोगाईत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आहे.
समृद्धी महामार्गावर अपघात
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटना अद्याप सुरूच आहेत. व्हॅगनआर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. गाडी दुभाजकाला धडकून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते आहे. जालन्यातील निधोना गावाजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. कारने कंटेनरला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशा चुराडा झाला आहे. कारच्या काचाही आत घुसल्या आहेत. या अपघातात तिघे ठार झाले आहेत.
भंडारा जिल्ह्यात बसचा अपघात
भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातील बसचा आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अपघात झाला आहे. या बसमध्ये ५० प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातील बस सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ५० प्रवासांना घेऊन तुमसर ते चंद्रपूर जाण्यासाठी निघाली होती. त्याचवेळी खरबी नाका गावाजवळ पोहोचतात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याचवेळी चालक संजय जाधव याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर बस ही डिव्हायडरला तोडून सर्विस रोडवर उतरली. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. सदर वेळी बस मध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते. कोणत्याही प्रवासाला गंभीर इजा झाली नसून दूसरी बस बोलावून प्रवाशांना सुखरूप पाठविण्यात आले आहे.