उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या `सुरुची` बंगल्याजवळ झालेल्या मध्यरात्रीच्या राड्यानंतर सकाळी दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे खा.उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे भोसले याच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुची' बंगल्याजवळ झालेल्या मध्यरात्रीच्या राड्यानंतर सकाळी दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे खा.उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे भोसले याच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनीही पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याची स्वतंत्र फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मध्यरात्री झालेला गोळीबार पोलिसांनी केला नाही, असे सांगितले गेल्यामुळे आता हा गोळीबार नेमका कोणत्या कार्यकर्त्याने केला, याचा शोध सुरु झाला आहे.