Maratha Reservation : जातीय जनगणना करुन मेरीटच्या आधारावर आरक्षण द्या, अशी मागणी उदयनराजेंनी (Udayanraje bhosale) केली आहे. आज मनोज जरांगे यांनी साताऱ्यात (Satara News) छत्रपती उदयनराजेंच्या त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राजकारण चांगलंच तापलंय. अशातच खासदार उदयनराजे भोसलेंनी मराठा आरक्षणावर मोठं विधान केलंय. मेरिटवर आरक्षण द्या, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असं सांगत उदयनराजेंनी आरक्षणाबाबत सावध भूमिका घेतलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगेंनी शुक्रवारी शाहू महाराज आणि संभाजीराजेंची भेट घेतल्यानंतर आज उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची भेट घेत चर्चा केली. यावेळी उदयनराजेंनी मनोज जरांगेंचं जंगी स्वागत केलं. इतकंच नाही तर त्यांना कानमंत्रही दिला. मी मनोज जरांगे यांना इतकंच सांगितलं आहे की, तुझं कुटुंब आहे, असं उदयनराजे म्हणाले आहेत. आधी मनोज जरांगे यांच्या कानात सांगितलं, नंतर उदयनराजे यांनी हात जोडले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळात कधीच भेदभाव केला नाही. कुणालाही अंतर दिलं नाही. त्यातून धडा घेणं गरजेचं आहे, असं उदयनराजे म्हणाले आहेत.


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी राज्यव्यापी दौरा सुरू केलाय. सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यानंतर साताऱ्यातही त्यांच्या सभा झाल्या. या दौऱ्याच्या निमित्तानं कोल्हापूर आणि सातारची गादीही जरांगेंच्या पाठिशी ठामपणे असल्याचं दिसून येतंय. 


नामदेव जाधव यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांवरील वक्तव्याचा विरोध


भूजबळांवर निशाणा


आज जाती-जातीत तेढ निर्माण केली जात आहे. ते कोण करतेय हे तुम्ही शोधा, मी कोणाविरुद्ध बोलणार नाही. मात्र, तुम्हाला मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे नसतील तर त्यांनी काय विष खाऊन मरायचे का? असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित करत त्यांनी छगन भूजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.