छत्रपती उदयनराजे पवारांच्या आठवणीने रडले आणि म्हणाले...
छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नवाच अवतार मंगळवारी पाहायला मिळाला. नेहमीच्या खास स्टाईलमध्ये त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं.
सातारा : आपल्या करारी, रोखठोक आणि धारदार भूमिकेमुळं ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नवाच अवतार मंगळवारी पाहायला मिळाला. नेहमीच्या खास स्टाईलमध्ये त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं. राजेशाही असती तर बलात्कार करणाऱ्यांना डायरेक्ट गोळ्या घातल्या असत्या, असं त्यांनी बजावलं. त्याचवेळी वडिलांच्या आणि शरद पवारांच्या आठवणीनं उदयनराजेंना चक्क गहिवरून आलं.
शरद पवार जर पोटनिवडणुकीला साताऱ्यातून उभे राहिले, तर मी अर्ज भरणार नाही, असं त्यांनी भावनेच्या भरात जाहीर करून टाकलं. मात्र आपल्याला दिल्लीतील बंगला आणि गाडी तेवढी द्यावी असंही उदयनराजे यांनी गंमतीत म्हटलंय.
मी समाजकारण केले, कधी राजकारण केले नाही. तुम्ही देखील योग्य विषयांना महत्व द्या, असंही राजेंनी मीडियाला यावेळी सांगितलं. मी काही नाही मागितलं, जे मागितलं ते साताऱ्यासाठी मागितलं असल्याचंही यावेळी उदयनराजे यांनी सांगितलं.