...आणि, खासदार उदयनराजे भोसले झाले भावूक
Udayanraje Bhosale Emotional : शिवजयंतीनिमित्ताने (Shiv Jayanti) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल बोलताना खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosle) भावूक.
सातारा : Udayanraje Bhosale Emotional : शिवजयंतीनिमित्ताने (Shiv Jayanti) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल बोलताना खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosle) भावूक झालेले पाहायला मिळालेत. त्या काळात आपण जन्माला आलो असतो तर मावळा म्हणून धन्य झालो असतो, असे खासदार उदयनराजे म्हणाले. एवढे मोठ मोठे नेते बघितले. मात्र 300 वर्षानंतरही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा असा मोठा जल्लोष पाहून ते खूप महान होते हेच दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
शिवरायांनी कधीच भेदभाव केला नाही. लोकशाहीचा पाया त्यावेळी छत्रपती शिवरायांनी तयार केला. त्यांची प्रतिमा ही देव्हाऱ्यात ठेवली जाते, ते लढले ते सर्व सामान्यजनतेसाठी आणि अशा कटुंबात मी जन्माला आलो. मी माझे स्वत:चे भाग्य समजतो, असे उदयनराजे म्हणाले.
मी त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून, मी माझे काम करत आलो आहे. शिवाजीमहाराज म्हणजे युगपुरुष होते आणि ते म्हंटलच पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मॉर्डन इंडियाचे त्यावेळचे आर्किटेक्ट होते. त्या काळात मी जन्माला आलो असतो तर मी मावळा म्हणून धन्य झालो असतो, असे ते म्हणाले.