सातारा : भाजप शिवसेनेच्या सत्ता स्थापनेच्या कलगीतुऱ्यावर उदयनराजे भोसले यांनी मिश्किल टिपणी केली आहे. रामदास आठवले यांच्या मागणीप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री करा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणूक २०१९ नंतर आता शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रिपदावरुन चढाओढ सुरु आहे. इतके दिवस होऊनही भाजप-शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात यश येत नाही. यावरुन  विरोधी पक्षाकडून रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा अशी टिपणी करण्यात आली होती. त्यावर रामदास आठवलेंनी, मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यास मी चांगलं काम करेन असं म्हटलं होतं. 


  


आठवलेंनी, माझ्या पक्षाने निवडणूकीत अधिक जागा जिंकल्या नाही. या सगळ्यात माझं नाव विनाकारण घेतलं जातंय. मी आता केंद्राच्या मंत्रिमंडळात असून खूश असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.