सातारा : 'दुसऱ्याच्या अंगावर चिखलफेक करण्यासाठी अक्कल लागत नाही. स्वतः काही करायचे नाही आणि कोणी काही करीत असेल, तर त्याला आडवे यायचे. निवडणुकांच्या काळातील जाहीरनाम्यातील एकेक गोष्ट आम्ही पूर्णत्वास नेत आहोत. तुम्ही ४२ वर्षांत काय केले आणि आम्ही काय करतोय हे एकदा समोरासमोर होऊन जाऊ द्या. नुसती दाढी वाढवून काही होत नाही,' असा घणाघात आज खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 यांनतर उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर निशाना साधत 'स्पर्धा' असावी ती कामाशी असावी शिवेंद्रराजे यांनी माझ्यावर विनाकारण आरोप केले आहेत. हे माझ्यासाठी नवीन नसून आतापर्यंत आमच्या राजघराण्याचा फायदा हा शिवेंद्र आणि त्यांचे वडिलांना मिळाला.  ४५वर्षे राजकीय सत्ता त्यांच्या ताब्यात होती. ती संघर्ष करुन मिळवावी लागली, असा दावा पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.



 प्रत्येक जिल्हयात संघटीतपणा दिसून येतो पण सातारा जिल्हयात मात्र कोणीही यावं आणि टपली मारुन जाव, अशी अवस्था सातारा जिल्हयाची झाली असून मी नसतो तर सातारा जिल्हयातील सर्व ऑफिस या बांडगुळांनी बारामती आणि कराडला पळवली असती, अशी घणघणाती टीका करत विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर खा. उदयनराजे भोसले यांनी केली