सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार आणि छत्रपती शिवरायांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत गेल्या ५ महिन्यात दीड कोटींची भर पडली आहे. राजघराण्याकडे तब्बल ४० किलोचे दागिने आहेत. उदयनराजे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती पुढे आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांनी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. उदयनराजे याआधी राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार झाले. उदयनराजे हे अब्जावधी संपतीचे मालक असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून समोर आलं आहे.


उदयनराजे भोसले यांचे उत्पन्न २०१४ मध्ये २ कोटी ३ लाख ५१ हजार होते. तेच उत्पन्न २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासह जोडलेल्या ताज्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी १ कोटी १५ लाखाचे उत्पन्न नमूद केले होते. म्हणजेच गेल्या ५ वर्षात त्यांचे उत्पन्न १ कोटी २० लाखाने कमी झाले होते. उदयनराजे भोसले आणि त्याचा पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी व्यवसाय म्हणून सुखवस्तू असे नमूद केले होते.


उदयनराजे भोसले यांची संपत्ती २०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे २०१७/१८ चे वार्षिक उत्पन्न १ कोटी १५ लाख ७१ हजार ३०६ रुपये दाखविण्यात आली होती. त्यांची वारसाप्राप्त मालमत्ता १ अब्ज ३४ कोटी ९३ लाख २० हजार ५२२ इतकी होती. तर जंगम मालमत्ता १२ कोटी ३१लाख ८४ हजार ३४८ होती. उदयनराजेंकडे मर्सिडिज बेन्ज, ऑडी, इन्डिवर, मारुती जिप्सी या अलिशान गाड्या असून त्यांची किमंत ९१ लाख ७० हजार आहे.


सुमारे १ कोटी ९० लाख ३५ हजार रुपये किमतीचे सर्व कुटुंबाचे सोन्या चांदीचे दागिने दर्शविण्यात आले होते. उदयनराजें आणि त्यांचा कुटुंबियांचे नावे विविध बँकाचे १ कोटी २३ लाख ४० हजार कर्ज दाखवण्यात आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी १ अब्ज १६ कोटी ३२ लाख एवढी मालमत्ता दाखवली होती. पण आता त्यांची संपत्ती ५ महिन्यात दीड कोटींनी वाढल्यांचं समोर आलं आहे.