सातारा : शरद पवारांनी फसवा-फसवी केली तर आम्ही बघून घेऊ, असा इशाराच 'राष्ट्रवादी काँग्रेस'चे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कर्मवीर जयंती कार्यक्रमासाठी सातारा दौऱ्यावर आहेत त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केल्यानंतर गाडीत बसताना खासदार उदयनराजे यांनी हा इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या खासदार उदयनराजे यांना राष्ट्रवादीकडून साताऱ्यासाठी तिकीट दिले जाईल की नाही? याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी सातारा दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांची भेट घेतली. 


पण या भेटीवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी वेगळ्या बाजूला आणि खासदार उदयनराजे वेगळ्या बाजूला अशी परिस्थिती सातारा विश्रामगृहात पाहायला मिळाली. 


यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, अमदार दिपक चव्हाण हे उपस्थित होते.  


...जेव्हा उदयनराजे पवारांच्याच गाडीत बसतात


यानंतर बाहेर आलेले उदयनराजे अनावधानानं चुकून शरद पवार यांच्याच टोयाटो लेक्सस गाडीत बसण्याचा प्रयत्न करताना दिसले. परंतु, लगेचच आपली चूक त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर 'माझी आणि पवार साहेबांची एकच गाडी आहे' असं गमतीने म्हणत 'दोन्ही गाडीचा रंग सारखाच' असल्यानं ही चूक झाल्याचं त्यांनी म्हटलं.