COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : साताऱ्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या बेधडक विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. सातारा गौरव पुरस्कार हा पुढील काळातही हा पुरस्कार असाच सुरु ठेवणार असल्याच सांगत असताना खा.उदयनराजे भोसले यांनी निळू फुले यांची नक्कल केली. या पुरस्काराच्या माध्यमातून एक एक कलाकार घडवणार असल्याची कमिटमेंट आपल्या शैलीत उदयनराजे यांनी दिली. 


काय आहे सातारा गौरव पुरस्कार?


राजघराण्याच्या वतीने देण्यात येणाऱ्या हा पुरस्कार स्वीकारायला अमिताभ बच्चन येणार का हा प्रश्न पत्रकारांनी विचारला यावर उदयनराजे भोसले यांनी मजेदार उत्तर दिलं, यावेळी एक हशा पिकला. परंतु एवढ्या मोठ्या व्यक्तीला  साताऱ्यात आणण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत, असं ही उदयनराजे म्हणाले. रयत शिक्षण संस्थेच्या विषयी बोलताना उदयनराजे भावूक झाले, ते म्हणाले की आमच्या घराण्याने संस्थेसाठी एवढं योगदान दिल परंतू, आमचा विचार कुठेच केला गेला नाही, याउलट माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यासारख्या व्यक्तीला पार्लमेंट्री मेंबर म्हणून, संस्थेत स्थान दिलं गेलं, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.


हिंमत असेल तर समोर येऊन बोला, असं आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक-निंबाळकरांना दिलं आहे.  'तुम्ही फक्त लेंग्याच्या नाड्या सोडत बसा' असा टोला ही त्यांनी मिस्टर रामराजे यांना लगावला आहे.