MVA Sambhajinagar Sabha :   महाविकास आघाडीचे (Mahavikasaaghadi) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले अशी टीका नेहमीच उद्धव ठाकरेंवर केली जाते. या टीकेला उद्दव ठाकरे यांनी जाहीर सभेतूनच प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय? असा थेट सवालच उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 


अमित शाहांच्या टीकेला प्रत्युत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सत्तेसाठी मी तळवे चाटले अशी टीका अमित शाहांनी पुण्यात केली होती. मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण, काही शब्द, भाषा त्यांनाच शोभणारी आहे, मला ती शोभणार नाही. आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय?" असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. 


नितीश कुमारांचं काय चाटत होता?


नितीश कुमार आणि लालूंचं सरकार तुम्ही पाडले. यानंतर तुम्ही नितीश कुमारांचं काय चाटत होता? कुणीही सोम्या-गोम्या आम्हाला काहीही म्हणणार. आम्ही गप्प बसायचं. आम्ही काहीही बोललं तर आमच्यावर खटले दाखल होणार. मोदींना काहीही म्हटलं तर मोदींचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. आज देशभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जातोय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. काँग्रेसबरोबर गेल्यावर हिंदुत्व सोडलं असेल असा आरोप केला गेला. मुफ्ती मोहम्मद सैद यांच्यासोबत तुम्ही काश्मीरात मांडीला मांडी लावून बसलात, तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं. तुम्ही म्हणाल तोच हिंदू आणि तुम्ही म्हणाल तोच देशद्रोही अशी यांची वृत्ती आहे. 


देशात एक विधान, एक निशाण 


"देशात एक विधान, एक निशाण असा यांचा कट आहे. दुसरा कोणता पक्ष यांना शिल्लक ठेवायचा नाही. देशाची अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे. सावरकरांचं स्वप्न होतं आसिंधू-सिंधूपर्यंत अखंड हिंदुस्थान. अखंड हिंदुस्थान दाखवण्याची यांच्यात हिंमत आहे का?" अस उद्धव ठाकरे म्हणाले.  


पाकव्याप्त काश्मीरमध्ये फौैजा घुसवून दाखवा


वल्लभभाई नसते, तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही, हा प्रश्न आहे. त्यांनी मराठवाडा मोकळा केला. पण तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही?  हिंमत असेल तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये फौजा  घुसवून दाखवा. देशभरातली भ्रष्ट माणसांना या पक्षात घेण्याचे काम भाजपमध्ये सुरु आहे. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.