बोंडाला गुलाबी अळी.... उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना सणसणीत टोला
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
Uddhav Thackeray Dasra Melava : मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.. माझी दाढी विरोधकांना खुपते.. मात्र होती दाढी म्हणून उद्धवस्त केली महाविकास आघाडी अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मविआवर तसंच ठाकरेंवर निशाणा साधला. मात्र उद्धव ठाकरेंनीही त्याला सणसणीत प्रत्युत्तर दिलं... भाजपला गुलाबी अळी अन् दाढीवाला खोडकिडा लागला अशा शब्दांत नाव न घेता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला..
मी नागपूर गेलो होते. शतेकऱ्यांशी संवाद साधला तिथे लोकांनी सांगितलं की शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. बॅंक कर्ज देत नाही. निसर्ग साथ देत नाही. कापसाच्या बोंडावर गुलाबी अळी येते तिला गुलाबी अळी म्हणतात. बोंडाला गुलाबी अळी आणि भाजपाच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागला आहे. भाजपाला फक्त सत्ता हवी आहे. त्याचा सत्ताजिहाद म्हणतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपाने धनगरांना आरक्षण देण्याचं आवश्वसन दिलं होतं. मात्र, त्यांना अद्यापही आरक्षण दिलेलं नाही. जातीजाती भांडण लावण्याचं काम भाजपा करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
संघाच्या कामाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आताची भाजपा संघाला मान्य आहे का, आम्हाला ही भाजपा मान्य नाही. तेव्हाचा भाजपा पवित्र होता. आताचा भाजपा हॅब्रिड झाला आहे. हा भाजपा आमच्यावर राज्य करून शकत नाही. भारतीय जनता पक्षाला भारतीय म्हणाला लाज वाटली पाहिजे. जनतेचा पक्ष आता राहिला नाही. ते चोरांना गद्दारांना डोक्यावर बसवत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.