लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. मुंबईतही शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.आज उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी  विधानसभा संपर्कप्रमुखांना नवी मोहीम दिली आहे. शिवसंपर्क मोहिम लक्ष्य 2024 असं या मोहिमेचे नाव आहे. यावेळी विविध कामे करण्याचे आदेश ठाकरेंनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना नव्या सूचना दिल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत मविआतील असलेले घटक पक्ष काँग्रेस, शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड आणि अन्य संघटनांची आणि पक्षांची माहिती उद्धव ठाकरे यांनी मागवली आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी पक्ष तळागाळात मजबूत होण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, वकील, डॉक्टर, शिक्षक, महिला बचत गटाच्या मुख्य प्रवर्तिका आणि अन्य प्रभावी व्यक्तींची माहिती मागितली आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीदेखील सुरू केली आहे. संपर्कप्रमुखांकडून उच्छुक उमेदवारांची नावे मागवली आहेत. त्यदृष्टीने लवकरच विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेऊन इच्छुक उमेदवारांसंदर्भात जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख आदी पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. 


उद्धव ठाकरे यांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मविआ उमेदवाराला मिळालेल्या आघाडीची कारणे आणि आघाडी जिथे मिळाली नाही त्याबाबतची कारणे मागितली आहेत. त्याचसोबत आपल्या विभागतील सर्वपक्षीय जिल्हापरिषदेतील, नगरसेवकांची, पंचायत समितीतील सदस्य संख्या,प्रत्येक मतदार संघातील जाती निहाय मतदार संख्या याची माहिती विधानसभा संपर्कप्रमुखांकडून मागितली  आहे. 


आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024 मध्ये विधानसभा संपर्कप्रमुखांनी करायची कामे


1. सर्व विधानसभा संपर्कप्रमुखांनी हा दौरा करणे आवश्यक. सोबत संबंधित उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख असणे आवश्यक आहे.


2. सदर मोहिमेअंतर्गत प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये बैठक आयोजित करणे आवश्यक आहे.


3. बैठकीसाठी स्थानिक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख (पुरुष-महिला), युवासेना शाखा युवा अधिकारी आदी पदाधिकारी अपेक्षित आहेत.



 सदर मोहिमेअंतर्गत खालील माहिती अपेक्षित आहे


1) गावातील शाखाप्रमुख, शाखासंघटक, युवासेना शाखा युवा अधिकारी इत्यादींची नावे व दूरध्वनी


2 गावात किती शिवसैनिकांची नोंदणी झाली आहे


3) नवीन मतदारांची नोंदणी किती झाली.


4) किती गावांमध्ये शाखा नाही.


5) नसल्यास कधी पर्यंत स्थापन करणार,


विभागात कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांची यादी मोबाईल क्रमांकासहित जोडावी.


1) गटप्रमुखाचे नाव 


2) यादी क्रमांक


3) संपर्क क्रमांक